सरलमध्ये माहीती भरण्यासाठी आवश्यक सुचना

सरल मधील STUDENT SUMMARY ची माहिती भरण्याकरीता मार्गदर्शक सुचना

 आपल्या जिल्हयाकरीता सरल
डेटाबेस प्रणाली मधील शाळा पोर्टल
वरील STUDENT SUMMARY वर माहिती
भरण्याकरीता टॅब (Login) उपलब्ध करुन देण्यात
आली आहे. सदरील टॅब मधील
माहिती वरुनच चालु शैक्षणिक वर्षाचा यु-डायस फॉर्म ऑनलाईन
तयार केला जाणार आहे. आपणांस विदितच आहे की, यु-डायस
फॉर्म मधील माहिती वरुनच केंद्र+राज्य
शासनामार्फत सर्व शालेय लाभाच्या योजना कार्यान्वयीत होत
असतात. त्याअनुषंगाने STUDENT SUMMARY मधील
दिलेल्या सर्व नमुन्यातील माहिती शालेय मुळ
दस्ताऐवजावरुन अचूक भरण्यात यावी. सदरील
शालेय माहितीचे यु-डायस फॉर्म प्रमाणेच विविध स्तरावर
पुर्नपडताळणी होत असते. जर एखादया शाळेने
चुकीची माहिती भरल्याचे निदर्शनास
आल्यास त्याची गंभिर दखल घेतली जाउुन
प्रशासकीय कार्यवाही प्रस्तावीत
केली जाईल याची सर्वांनी नोंद
घ्यावी. तसेच माहिती भरण्यास तात्काळ सुरुवात
करावी.
STUDENT SUMMARY मध्ये माहिती कशी
भरावी.
1. सर्व प्रथम सरल प्रणालीच्या www.education.m
aharashtra.gov.in या वेबसाईटवर जाऊन SCHOOL पोर्टल ओपन
करावे.
2. त्यानंतर आपणापुढील screen वर STUDENT
SUMMARY ची टॅब दिसून येईल तीला click
करावे.
3. अता नेहमी प्रमाणे लॉगीन ची
window येईल त्यात आपल्या शाळा पोर्टलच्या login ID PASSWORD
ने लॉगीन व्हावे.
(लक्षात ठेवा STUDENT पेार्टलचा पासर्वर्ड या ठिकाणी वापरु
नये.)
4. STUDENT SUMMARY वर लॉगीन झाल्यानंतर आडव्या
मेनु मध्ये विविध नमुन्यातील (11 table) माहिती
अचूक भरुन प्रत्येक पेज शाळा पोर्टल प्रमाणे update आणि finalize
देखील करावयाचे आहे.
STUDENT SUMMARY मध्ये अंर्तभूत असणारे विविध नमुने-
1.इयत्ता 1 ली प्रवेश पात्र वयानुरुप मुला-
मुलींची संख्या.
2.जात प्रवर्ग व इयतानिहाय मुला-मुलींची संख्या.
3.अल्पसंख्याक धर्मनिहाय व वर्गनिहाय मुला-
मुलींची संख्या.
4.वर्गनिहाय वयानुरुप विदयार्थी पटसंख्या.
5.पुर्नप्रवेश जातनिहाय.
6.पुर्नप्रवेश अल्पसंख्यांक.
7.मागील वर्षातील विदयार्थी लाभच्या
योजनांची सांख्यिकीय माहिती
(प्राथमिक)
8.मागील वर्षातील विदयार्थी लाभच्या
योजनांची सांख्यिकीय माहिती (उच्च
प्राथमिक)
9.शाळेतील अपंग विदयार्थ्यांची अपंगत्वाचे
प्रकारानुसार माहिती.
10.मागील वर्षी अपंगत्वाच्या साधनांचा लाभ दिलेले
विदयार्थी माहिती.
11.मगील वर्षाचा इत्यंभूत निकाल.
सदरील माहिती ही अत्यंत सुक्ष्म
स्वरुपाची असल्याने व त्यानुसारच शाळा+विदयार्थ्यांना विविध
योजनांचा लाभ मिळणे अवलंबून असल्याने मुख्याध्यपकांनी
उपरोक्त माहिती स्वत: भरावी. इतरांवर विसंबून राहु
नये
उपरोक्त सुचनांप्रमाणे कार्यवाही अपेक्षित आहे.

Post a Comment

0 Comments